मंगळवार आणि शुक्रवारचे सेशन छान चालू होते, खूप काही नवनव्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. निमि(निसर्गमित्र,पनवेल) सोबत आता आहे म्हटलं तर निमि साठी काहीतरी करावं या हेतूने मागच्या मीटिंग मध्ये मी रायगड फॅमिली ट्रेकची लीडरशिप घेण्याचं ठरवलं. क्लाइम्बिंगचा सीझन हा मर्यादित म्हणजे अडीच-तीन महिन्यांचाच असतो, आणि त्यात पण आम्ही भटके फक्त वीकेंडलाच बाहेर पडतो मग तर काय मोजकेच दिवस. त्यामुळेच प्रत्येकाला वाटत जितके दिवस मिळतात ते नीट करावं. पण माझं झालं असं आता म्हटलं काहीच प्लॅन दिसत नाही तर रायगड ट्रेकची कुमार काकांसोबत रेकी करून यावी आणि दिवस ठरवला शनिवार ७ जानेवारी. नंतर मंगळवारच्या सेशनमध्ये आम्ही क्लाइम्बिंग टिम भेटल्यावर येणाऱ्या वीकेंडला तैलबैला expedition ठरलं, झालं मी माती खाल्ली. विश्वेषला मी माझ्या ठरल्या रायगड रेकी बद्दल सांगितलं, भावाचा चेहराच सगळं बोलून गेला. मी तर कॅन्सल झालो, पण तरीही विश्वेषचे शब्द कानात गुंजत होते "भावा तू पाहिजे आपल्याला", पण ते शक्य नव्हतं.
तैलबैला expedition चा विषय मी सोडून दिला, आणि रायगड रेकी करायला गेलो. पहाटे ५ वाजता मी, कुमार काका, जयवंत दादा, निखिल पाटील पनवेल मधून निघालो, या सर्व कसलेल्या मंडळींसोबत वेगात आणि वेळेत बऱ्यापैकी रायगड भटकून आणि पुढच्या ट्रेकच नियोजन करून आम्ही दीड वाजता गाडीत बसून परतीच्या प्रवासाला लागलो. अर्ध्या-एक तासात माझ्या मनात विचार आला कि आपण आता तैलबैलाला जाणाऱ्या टीमला गाठू शकतो, माझं मत मी कुमार काकांना सांगितलं त्यांनीही लागेच होकार दर्शवत टीमला फोन करून मी येत असल्याची वार्ता देण्यास सांगितलं. विश्वेषला मी फोन केला आणि सांगितलं कि "मला तैलबैला expedition ला यायला जमेल का? तुम्ही निघेपर्यंत मी येऊ शकतो".माझी यायची खूप इच्छा होती हे तर त्याला माहीत होत, आणि माझा अचानक असा फोन गेल्यावर तर तो इतका खुश झाला ना कि काय सांगू. एका टीम लीडर ला असलेली आपल्या टीम पार्टनरची आस्था प्रकर्षाने जाणवली (थँक यु भावा
) सहा-साडेसहा ला आम्ही पनवेलला पोचलो आणि मी लगेच क्लाइम्बिंग टीमला जॉईन झालो.
परागच्या घरी सगळी बॅगपॅकिंग चालू होती, ७ वाजता मी, पराग, विश्वेष, कौस्तुभ मराठे, राम, रवी, ऐश्वर्या, अक्षय देशमुख, वरद आणि वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका तैलबैला गावाच्या दिशेने मार्गस्थ झालो, प्रशांत आणि प्रमोद देखील बाईकवरून निघाले होते. साडेनऊच्या आसपास तैलबैला गावात पोचलो, सर्वानी मिळून(विशेषतः वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका) जेवण बनवलं आणि जेवण आटोपून सर्वांनी डोळे मिटले.
रविवार ८ जानेवारी सकाळी ६ वाजता सगळे उठले (सहा कसले तीन वाजल्यापासून कुणा दुसऱ्या ग्रुपमधल्या एकाचा अलार्म वाजत होता, त्यातच झोपेचे तीन-तेरा झाले होते). शिशिरातली सकाळ ती, मस्त कोवळं ऊन, धुक्याची चादर, शहारे आणणारी गुलाबी थंडी, आणि हातात चहाचा कप, अहाहा!(कल्पना नाही, खर होत हे) रोजची सकाळ अशी, कधी लागू नये दृष्ट... लगेच चहा ब्रेड बटर, सँडविच, अंडी पोटात ढकलून साडेसात ला तैलबैला वॉल च्या दिशेने पावले निघाली.
आठ वाजता तैलबैला वॉलच्या बेसला पोचलो, तर अगोदरच एका टीमचं तिथे क्लाइम्बिंग चालू होत. आम्ही आमचा बेसकॅम्प सेटअप केला, आणि आता आम्हाला त्या टीमचं क्लाइम्बिंग बघत, त्यांचं क्लाइम्बिंग संपायची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विश्वेष आणि परागने एक शक्कल लढवली, त्यांच्याकडे आमचा एक रोप देऊन वर दुसऱ्या स्टेशनवर अँकर करायला सांगितला, त्या रोपच्या सहाय्याने परागने वर जाऊन स्वतःचा टॉप अँगल फोटोग्राफी साठी स्वत:चा सेटअप केला. एक वाजता त्या मंडळींनी त्यांचा कार्यक्रम आटोपून ती अजस्त्र भिंत आमच्या हवाली केली. आमची टीम रेडीच होती, वरद फर्स्ट मॅन , राम सेकंड मॅन होऊन पट्ठ्यानी लगेच क्लाइम्बिंग चालू केलं, विश्वेष खालून त्यांना गाईड करत होता, वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका असल्याने विश्वेषच्या तोंडाला चांगलाच कुलूप बसलं होत.

वरद चढला, गाठलं, पहिलं स्टेशन गाठलं, दुसरही गाठलं, पाठोपाठ राम होताच, परागची मस्त फोटोग्राफी चालू होती, क्लाइंबर्स दुसऱ्या स्टेशनला पोचल्यावर झुमारींगचा सेटअप रेडी होता, आणि आम्हीही तयारीतच होतो.
विश्वेषने पहिलाच जुमारिंगचा मान मला दिला, पनवेल मध्ये प्रॅक्टिसला १७-१८ फुटावर केलेला सराव आम्हाला इथे शे-सव्वाशे फुटांवर अंमलात आणायचा होता. रोपला लावलं मला, आणि सांगितलं कि तुझ्या वजनाने रोप खाली येईल, मीही मनात विचार केला, काय तर एक-दोन फूट येईल खाली म्हणत मी माझं वजन त्या रोपवर टाकलं, आणि काय सरसर खालीच जायला लागलो, मी करतोय परागने रोप अडकवलाय कि नाही, मी आता थेट थेट दरीत! या तीन-चार सेकंदात माझी चांगलीच भांबेरी उडली. मस्तपैकी दहा-बारा फूट मी खाली गेलो होतो.

आता मी रोपवर बरोबर सेट झालो होतो, आणि मी जुमार करायला सुरुवात केली, सुरुवातीलाच ते खाली जाण, ती दुरून बघितलेली तैलबैला वॉलची उंची, आणि आता डोळ्यांसमोर फिरणारा तो कातळ कडा, एक-दोन क्षण माझं अवसानच गळालं होत. तेवढ्यात तिकडून विश्वेषची हाक आली "विशाल तुला काय करायचं माहित आहे, जसं पनवेल मध्ये केलंस तसंच करायचं आहें", का कुणास ठाऊक पण क्लाइम्बिंग मधल्या या गुरुतुल्य भावाचे शब्द एक वेगळीच प्रेरणा देतात. सुरुवात थोडी चुकत, कमी उंची गाठत, नंतर शब्दसुमने आली की नव्या दमाने असं करत मी अर्ध्याहून अधिक उंची कापली. आता एक क्षण असा आला कि माझ्या अंगातील सर्व ताकद संपली आणि मनात विचार घुमू लागले कि आता हे पूर्ण होईल कि नाही, तेवढ्यात विश्वेषने पुन्हा सांगितलं कि नीट, सावकाश, आणि मन शांत ठेवून कर, विश्वेश जसा शब्दसुमने टाकत असतो ना, तसंच त्याच हे चिअर अप करणं खरच एका अनुभवी माणसाच्या मार्गदर्शनाखाली आपण घडतोय, याची प्रचिती आली. त्याने मला त्या रोपवरच काही वेळ रेस्ट घ्यायला सांगितली, मीही लगेच हात पाय मोकळे करून त्या रोपवरच लटकून राहिलो, आणि पुन्हा पुढचा टप्पा पूर्ण करण्यास लागलो. आता एक मस्त overhang(कातळाचा पुढे आलेला भाग) होता. दगडाला पाय लावून, चुकत, सावरत, अखेर तो ओव्हरहॅंग मी पार केला, आणि मी परागच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, खालून विश्वेश आणि वरून पराग दोघांच्या गाईडन्सखाली अखेर मी ती उंची पार केली आणि स्टेशनला पोचलो.
बारा-पंधरा मिनिटात मी ती शे-सव्वाशे फुटांची उंची सर केली,पहिल्यांदाच इतकं जुमारिंग केल्याने खूप थकल्यासारखं वाटत होतं, आणि स्टेशनला पोचल्यावर उभं राहताना एकदम थरथरत होतो. परागने लगेच मला सेल्फ लावला, राम आणि वरदही तेव्हा तिथेच होते, त्यांनी लगेच पुढचं क्लाइम्बिंग चालू केलं. मागच्या माहुली नवरी expedition च्या वेळी जुमारिंग अवगत नसल्याने वर जाता आले नव्हते, त्याची कमी भरून काढल्याचा आनंद माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि काही तरी प्रगती आहे हे पाहून बरं वाटलं.

माझ्या मागे लगेच कौस्तुभ मराठे, प्रशांत आणि रवी देखील जुमारिंग करत स्टेशनला आले. स्टेशनला थांबायला जास्त जागा नव्हती मागच्या माहुली नवरी सारखं आम्हाला तिथेच न थांबवता खाली पाठवण्याचा निर्णय सिनियर्सनी घेतला. कौस्तुभने अगोदर रॅपलिंग केलं होतं, म्हणून त्याला पहिल्यांदा खाली पाठवण्याच ठरलं. चुकत-अडखळत, स्वत:ला सावरत कौस्तुभ खाली उतरला. आता रॅपलिंग करण्याची माझी पाळी, माहुली नवरी वर आणि सेशन मध्ये सांगितलेली टेक्निक वापरून मी हळू हळू खाली उतरलो, खाली उतरून त्या वॉल कडे बघताना एक विजयी भावमुद्रा होती, संपूर्ण नाही करता आलं, पण जितकं केलं ते सुद्धा आतापर्यंतच्या प्रवासात खूप होतं.
माझ्या मागोमाग लगेच प्रशांत, रवी खाली आले तर दुसऱ्या बाजूने ऐश्वर्या, अक्षय हे देखील जुमारिंग करत वर गेले, वेळेचं गणित बघून प्रमोदने वर न जाण्याचा निर्णय घेतला, टीमच्या दृष्टीने त्याने घेतलेला हा निर्णय खूप प्रशंसाजणक होता.क्लाईंबर्सने तोपर्यंत तैलबैलाच्या समिट वर आपले पाय रोवले होते, आणि निसर्गमित्र,पनवेलच्या यशात अजून एक तुरा लावला.
आता पर्यंत बेसकॅम्प सांभाळणारे वरद-ऐश्वर्याच्या आई-बाबा-काकांनी हळूहळू खाली जाण्याचा निर्णय घेतला. विश्वेषनेही जुमारिंग करत स्टेशन गाठलं आणि मग सर्वानी एकेक करत खाली यायला सुरुवात केली. आम्ही बेसकॅम्प वाल्यांनीही लगेच वाइंडअप ला सुरुवात केली, वरची टीम येईपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं, वरची टीम खाली आल्यावर त्यांनीही सगळं आवरत घेतलं, त्यांचं काम चालू आहे तर मी एकाबाजूने त्यांना राहिलेला खाऊ भरवण्याचं काम करत होतो.
अंधार व्हायच्या आत आम्ही बेसकॅम्प सोडलं आणि पायांना गती देत खाली उतरलो, गाड्यांमध्ये सामान भरत जसे आलो तसे
परतीच्या प्रवासाला लागलो. प्रशांत आणि प्रमोदने बाईकला किक मारून नॉनस्टॉप पनवेल गाठलं तर आम्ही बाकी मंडळींनी मध्ये एक मॅगी ब्रेक घेऊन रात्री १०च्या सुमारास पनवेल गाठलं. अशा प्रकारे माझी(अनपेक्षितपणे) आणि माझ्या टीमची तैलबैला मोहिम यशस्वीरित्या फत्ते झाली.
टीम मेंबर्स :-
एक्सपेडिशन लीडर - विश्वेष महाजन, पराग सरोदे
लीड क्लाइंबर - वरद पवार
सेकंड मॅन - राम पाटील
जुमारिंग- ऐश्वर्या पवार, विशाल पाटील, अक्षय देशमुख, कौस्तुभ मराठे, रवी खोसे, प्रशांत जगनाडे
बेसकॅम्प - प्रमोद पाटील, अस्मिता पवार, अनिल पवार, रुपेश करण
टॉप अँगल फोटोग्राफी- पराग सरोदे
।। इति तैलबैला अध्याय समाप्ती ।।
तैलबैला क्लाइंबिंगचे अजून फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची... भेटूया पुढच्या expedition ला ...
धन्यवाद!
आपलाच,
सह्याद्रीचा भटकभवान्या...
![]() |
| तैलबैला(गावाकडची बाजू) |
) सहा-साडेसहा ला आम्ही पनवेलला पोचलो आणि मी लगेच क्लाइम्बिंग टीमला जॉईन झालो.![]() |
| रात्रीच्या मुक्कामी |
परागच्या घरी सगळी बॅगपॅकिंग चालू होती, ७ वाजता मी, पराग, विश्वेष, कौस्तुभ मराठे, राम, रवी, ऐश्वर्या, अक्षय देशमुख, वरद आणि वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका तैलबैला गावाच्या दिशेने मार्गस्थ झालो, प्रशांत आणि प्रमोद देखील बाईकवरून निघाले होते. साडेनऊच्या आसपास तैलबैला गावात पोचलो, सर्वानी मिळून(विशेषतः वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका) जेवण बनवलं आणि जेवण आटोपून सर्वांनी डोळे मिटले.
रविवार ८ जानेवारी सकाळी ६ वाजता सगळे उठले (सहा कसले तीन वाजल्यापासून कुणा दुसऱ्या ग्रुपमधल्या एकाचा अलार्म वाजत होता, त्यातच झोपेचे तीन-तेरा झाले होते). शिशिरातली सकाळ ती, मस्त कोवळं ऊन, धुक्याची चादर, शहारे आणणारी गुलाबी थंडी, आणि हातात चहाचा कप, अहाहा!(कल्पना नाही, खर होत हे) रोजची सकाळ अशी, कधी लागू नये दृष्ट... लगेच चहा ब्रेड बटर, सँडविच, अंडी पोटात ढकलून साडेसात ला तैलबैला वॉल च्या दिशेने पावले निघाली. ![]() |
| पाऊले चालती तैलबैलाची वाट... |
आठ वाजता तैलबैला वॉलच्या बेसला पोचलो, तर अगोदरच एका टीमचं तिथे क्लाइम्बिंग चालू होत. आम्ही आमचा बेसकॅम्प सेटअप केला, आणि आता आम्हाला त्या टीमचं क्लाइम्बिंग बघत, त्यांचं क्लाइम्बिंग संपायची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विश्वेष आणि परागने एक शक्कल लढवली, त्यांच्याकडे आमचा एक रोप देऊन वर दुसऱ्या स्टेशनवर अँकर करायला सांगितला, त्या रोपच्या सहाय्याने परागने वर जाऊन स्वतःचा टॉप अँगल फोटोग्राफी साठी स्वत:चा सेटअप केला. एक वाजता त्या मंडळींनी त्यांचा कार्यक्रम आटोपून ती अजस्त्र भिंत आमच्या हवाली केली. आमची टीम रेडीच होती, वरद फर्स्ट मॅन , राम सेकंड मॅन होऊन पट्ठ्यानी लगेच क्लाइम्बिंग चालू केलं, विश्वेष खालून त्यांना गाईड करत होता, वरद-ऐश्वर्याचे आई-बाबा-काका असल्याने विश्वेषच्या तोंडाला चांगलाच कुलूप बसलं होत.
![]() |
| फर्स्ट मॅन वरद |
![]() |
| सेकंड मॅन राम |

वरद चढला, गाठलं, पहिलं स्टेशन गाठलं, दुसरही गाठलं, पाठोपाठ राम होताच, परागची मस्त फोटोग्राफी चालू होती, क्लाइंबर्स दुसऱ्या स्टेशनला पोचल्यावर झुमारींगचा सेटअप रेडी होता, आणि आम्हीही तयारीतच होतो.
विश्वेषने पहिलाच जुमारिंगचा मान मला दिला, पनवेल मध्ये प्रॅक्टिसला १७-१८ फुटावर केलेला सराव आम्हाला इथे शे-सव्वाशे फुटांवर अंमलात आणायचा होता. रोपला लावलं मला, आणि सांगितलं कि तुझ्या वजनाने रोप खाली येईल, मीही मनात विचार केला, काय तर एक-दोन फूट येईल खाली म्हणत मी माझं वजन त्या रोपवर टाकलं, आणि काय सरसर खालीच जायला लागलो, मी करतोय परागने रोप अडकवलाय कि नाही, मी आता थेट थेट दरीत! या तीन-चार सेकंदात माझी चांगलीच भांबेरी उडली. मस्तपैकी दहा-बारा फूट मी खाली गेलो होतो.
![]() |
| क्लाइंबर्स |

आता मी रोपवर बरोबर सेट झालो होतो, आणि मी जुमार करायला सुरुवात केली, सुरुवातीलाच ते खाली जाण, ती दुरून बघितलेली तैलबैला वॉलची उंची, आणि आता डोळ्यांसमोर फिरणारा तो कातळ कडा, एक-दोन क्षण माझं अवसानच गळालं होत. तेवढ्यात तिकडून विश्वेषची हाक आली "विशाल तुला काय करायचं माहित आहे, जसं पनवेल मध्ये केलंस तसंच करायचं आहें", का कुणास ठाऊक पण क्लाइम्बिंग मधल्या या गुरुतुल्य भावाचे शब्द एक वेगळीच प्रेरणा देतात. सुरुवात थोडी चुकत, कमी उंची गाठत, नंतर शब्दसुमने आली की नव्या दमाने असं करत मी अर्ध्याहून अधिक उंची कापली. आता एक क्षण असा आला कि माझ्या अंगातील सर्व ताकद संपली आणि मनात विचार घुमू लागले कि आता हे पूर्ण होईल कि नाही, तेवढ्यात विश्वेषने पुन्हा सांगितलं कि नीट, सावकाश, आणि मन शांत ठेवून कर, विश्वेश जसा शब्दसुमने टाकत असतो ना, तसंच त्याच हे चिअर अप करणं खरच एका अनुभवी माणसाच्या मार्गदर्शनाखाली आपण घडतोय, याची प्रचिती आली. त्याने मला त्या रोपवरच काही वेळ रेस्ट घ्यायला सांगितली, मीही लगेच हात पाय मोकळे करून त्या रोपवरच लटकून राहिलो, आणि पुन्हा पुढचा टप्पा पूर्ण करण्यास लागलो. आता एक मस्त overhang(कातळाचा पुढे आलेला भाग) होता. दगडाला पाय लावून, चुकत, सावरत, अखेर तो ओव्हरहॅंग मी पार केला, आणि मी परागच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, खालून विश्वेश आणि वरून पराग दोघांच्या गाईडन्सखाली अखेर मी ती उंची पार केली आणि स्टेशनला पोचलो.
बारा-पंधरा मिनिटात मी ती शे-सव्वाशे फुटांची उंची सर केली,पहिल्यांदाच इतकं जुमारिंग केल्याने खूप थकल्यासारखं वाटत होतं, आणि स्टेशनला पोचल्यावर उभं राहताना एकदम थरथरत होतो. परागने लगेच मला सेल्फ लावला, राम आणि वरदही तेव्हा तिथेच होते, त्यांनी लगेच पुढचं क्लाइम्बिंग चालू केलं. मागच्या माहुली नवरी expedition च्या वेळी जुमारिंग अवगत नसल्याने वर जाता आले नव्हते, त्याची कमी भरून काढल्याचा आनंद माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि काही तरी प्रगती आहे हे पाहून बरं वाटलं. 
माझ्या मागे लगेच कौस्तुभ मराठे, प्रशांत आणि रवी देखील जुमारिंग करत स्टेशनला आले. स्टेशनला थांबायला जास्त जागा नव्हती मागच्या माहुली नवरी सारखं आम्हाला तिथेच न थांबवता खाली पाठवण्याचा निर्णय सिनियर्सनी घेतला. कौस्तुभने अगोदर रॅपलिंग केलं होतं, म्हणून त्याला पहिल्यांदा खाली पाठवण्याच ठरलं. चुकत-अडखळत, स्वत:ला सावरत कौस्तुभ खाली उतरला. आता रॅपलिंग करण्याची माझी पाळी, माहुली नवरी वर आणि सेशन मध्ये सांगितलेली टेक्निक वापरून मी हळू हळू खाली उतरलो, खाली उतरून त्या वॉल कडे बघताना एक विजयी भावमुद्रा होती, संपूर्ण नाही करता आलं, पण जितकं केलं ते सुद्धा आतापर्यंतच्या प्रवासात खूप होतं.
माझ्या मागोमाग लगेच प्रशांत, रवी खाली आले तर दुसऱ्या बाजूने ऐश्वर्या, अक्षय हे देखील जुमारिंग करत वर गेले, वेळेचं गणित बघून प्रमोदने वर न जाण्याचा निर्णय घेतला, टीमच्या दृष्टीने त्याने घेतलेला हा निर्णय खूप प्रशंसाजणक होता.क्लाईंबर्सने तोपर्यंत तैलबैलाच्या समिट वर आपले पाय रोवले होते, आणि निसर्गमित्र,पनवेलच्या यशात अजून एक तुरा लावला.
![]() |
| विजयी भावमुद्रा |
आता पर्यंत बेसकॅम्प सांभाळणारे वरद-ऐश्वर्याच्या आई-बाबा-काकांनी हळूहळू खाली जाण्याचा निर्णय घेतला. विश्वेषनेही जुमारिंग करत स्टेशन गाठलं आणि मग सर्वानी एकेक करत खाली यायला सुरुवात केली. आम्ही बेसकॅम्प वाल्यांनीही लगेच वाइंडअप ला सुरुवात केली, वरची टीम येईपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं, वरची टीम खाली आल्यावर त्यांनीही सगळं आवरत घेतलं, त्यांचं काम चालू आहे तर मी एकाबाजूने त्यांना राहिलेला खाऊ भरवण्याचं काम करत होतो.
![]() |
| टीम निसर्गमित्र |
अंधार व्हायच्या आत आम्ही बेसकॅम्प सोडलं आणि पायांना गती देत खाली उतरलो, गाड्यांमध्ये सामान भरत जसे आलो तसे
परतीच्या प्रवासाला लागलो. प्रशांत आणि प्रमोदने बाईकला किक मारून नॉनस्टॉप पनवेल गाठलं तर आम्ही बाकी मंडळींनी मध्ये एक मॅगी ब्रेक घेऊन रात्री १०च्या सुमारास पनवेल गाठलं. अशा प्रकारे माझी(अनपेक्षितपणे) आणि माझ्या टीमची तैलबैला मोहिम यशस्वीरित्या फत्ते झाली.
टीम मेंबर्स :-
एक्सपेडिशन लीडर - विश्वेष महाजन, पराग सरोदे
लीड क्लाइंबर - वरद पवार
सेकंड मॅन - राम पाटील
जुमारिंग- ऐश्वर्या पवार, विशाल पाटील, अक्षय देशमुख, कौस्तुभ मराठे, रवी खोसे, प्रशांत जगनाडे
बेसकॅम्प - प्रमोद पाटील, अस्मिता पवार, अनिल पवार, रुपेश करण
टॉप अँगल फोटोग्राफी- पराग सरोदे
।। इति तैलबैला अध्याय समाप्ती ।।
तैलबैला क्लाइंबिंगचे अजून फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची... भेटूया पुढच्या expedition ला ...
धन्यवाद!
आपलाच,
सह्याद्रीचा भटकभवान्या...

खूप छान...
ReplyDeleteKarach jabardast
ReplyDeleteGreat...Congratulations Team
ReplyDeleteGreat...Congratulations Team
ReplyDeleteKhupach chan
ReplyDelete