नदी नव्हे ही निसर्ग नीती,
आत्मगतीने सदा वाहती,
संथ वाहते कृष्णामाई...
गदिमांनी
लिहिलेल्या तर बाबूजींनी गायलेल्या या गीताची ओळ न ओळ सार्थ ठरली ती offbeat
प्रवासवारी आयोजित "प्रवास कृष्णामाईचा" या हेरिटेज सहलीमध्ये. Offbeat प्रवासवारी
हे सुरू करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे गाईड आणि इतिहास अभ्यासक यातील फरक समजून
अभ्यासकासोबत डोळस भटकंती करणे, जेणेकरून ऐतिहासिक वास्तूंकडे/ठिकाणांकडे बघण्याचा
आपला दृष्टिकोन बदलेल. पहाटे वाईला लवकर पोचल्यामुळे सर्वांना पहाटेच्या काळोखात
शांत पणे वाहणारी कृष्णा दाखवून एक वेगळीच अनुभूती दिली.
वाई म्हटलं की वाईचा ढोल्या गणपती आपल्यासमोर येतो,त्याच्या पलिकडचा वाई आपल्या कुणालाच माहिती नाही. आणि म्हणूनच पहिल्या दिवशी मार्गदर्शन लाभलं ते इतिहास अभ्यासक आणि लेखक आदित्य चौंडे याचं!

मधली आळी, गणपती आळी, रामेश्वर घाट, गंगापुरी घाट, मेणवली घाट...
म्हणायला गेलं तर फक्त कृष्णेच्या काठावरचे घाटच मात्र आदित्यने त्याच्या पोतडीतून
एक एक घाटाची माहिती, बारकावे आणि इतिहास सांगून प्रत्येक घाट कसा वेगळा आहे
ऐतिहासिक दृष्ट्याही आणि स्थापत्याच्या दृष्ट्याही ते समजावलं त्यामुळे प्रत्येक
घाटाचा ठळकपणा कळू लागला.
गणपती मंदिरासमोरचा गणपती घाट सर्वांच्या परिचयाचा मात्र त्याच्या मागेच असलेला मधल्या आळीचा घाट तेथील पार, आणि शांत रमणीय छोटंसं गणपती मंदिर सुरेखच होतं. सरदार रास्ते यांनी बांधलेला लांबच लांब विस्तारलेला गंगापुरी घाट तेथील त्यांचा रास्ते वाडा, वाड्यातील फ्रेस्को पेंटिंग त्यातील बारकावे आणि विशेष म्हणजे त्या वाड्यात आता चालू असलेलं शासकीय मुद्रणालय.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विश्वकोशाची निर्मिती येथेच झाली. पुढे प्राज्ञपाठशाळा म्हणजे संस्कृत आणि धार्मिक अध्ययनाचे एक अग्रगण्य स्थानच म्हणावे लागेल. नारायण सदाशिव मराठे उर्फ केवलानंद सरस्वती यांनी या प्राज्ञपाठशाळेची स्थापना केली. विशेष म्हणजे येथे आम्हाला सतराव्या शतकातील ज्ञानेश्वरीची मूळ हस्तलिखित प्रत पाहता आली, या प्रतीचं आधुनिक पद्धतीने संवर्धन करण्याचा काम येथे चालू होतं. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने जावं असंच हे स्थळ.

वाईपासून जरा बाहेर असलेलं वाकेश्वर शिवमंदिर इथला सध्या असलेल्या नंदीपेक्षा
मंदिराच्या आवारात असलेला भग्न नंदी जास्त देखणा आणि रुबाबदार दिसत होता. मंदिरातील
शिवपिंडी आणि गणपती सोबत मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेले नागशिल्प, गजशिल्प, दोन
मल्ल आणि हरणांचं कुटशिल्प तर विशेष होतं कारण यात दोन हरीणी अशा कोरल्या आहेत की
त्या चार आहेत असं दिसत होत.
मंदिरांनी समृद्ध असलेल्या वाईत महागणपती मंदिर जितका अवाढव्य आणि अप्रतिम तीच परंपरा बाजूच्या काशी विश्वेश्वर मंदिराने देखील लीलया सांभाळली आहे. काशीविश्वेश्वराचे शिखर तर शिल्पांनी अक्षरशः नटले आहे.
आदित्य चौंडे यांच्या पणजोबांनी म्हणजे ह.भ.प. चौंडे महाराजांनी सुरू केलेली गोशाळा हा देखील वाईचा वारसा आहे. एका गाईला वाचवण्यापासून सूरु झालेल्या या प्रवासाचा आवाका आता 300 एकर परिसरात पसरलेला आहे. गंगापुरी वेस, मेणवली वेस यासारख्या बऱ्याच वास्तू वाईमध्ये दिमाखात उभ्या आहेत, परंतु घड्याळातील काट्यांची गती बघता पुढची काही ठिकाणे अशीच सरस असल्याने पाय तिकडे वळतात.

कला आणि स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना
म्हणजे मेणवली मधील नानासाहेब पेशव्यांचा वाडा. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या प्रत्येक
दालनातील कलाकुसर बघता आपला इतिहास किती समृद्ध आणि घरंदाज होता याची प्रचिती येते.
वाड्यातून बाहेर पडताना 15 जणांच्या साखळीने घेराव करावा लागला इतका मोठा गोरखचिंचेचा झाड पाहून अवाक व्हायला झालं. तिथून पुढे नदीच्या दिशेने आल्यावर दर्शन होते आखीव रेखीव अशा चंद्रकोरीच्या आकाराच्या घाटाचं. कृष्णेचं पात्र इथे वळण घेत दक्षिणवाहिनी होतं आणि म्हणूनच या वळणावरच्या घाटाची निर्मिती चंद्रकोरीसारखी केली आहे.
येथील कृष्णाच्या मंदिराला कुलुप होतं मात्र मेणेश्वर मंदिर आणि तेथील पोर्तुगीज कालीन घंटा आणि तो सारा परिसर जणू चैतन्य लहरी पसरवीत होता असे जाणवत होता. पुढचा टप्पा धोम येथील सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिर. यांच्याही पलीकडे इथे जे अद्भुत होत ते म्हणजे कमळाच्या आकारातील पुष्कर्णीत स्थित दगडी कासव त्यावर असलेल्या बैठकीवर विराजमान झालेला नंदी आणि त्या नंदीवर असलेलं अष्टखांबी मंडप.
या नंदीमंडपाच्या चुनेगच्ची शिखरावर देखील विपुल प्रमाणात नक्षीकाम होतं. जणू काही कासव नंदीला आपल्या पाठीवर बसवून सिद्धेश्वराच्या दर्शनाला घेऊन चालला आहे.

दिवस
आता मावळतीकडे झुकला होता आणि आम्ही देखील धोम डॅमच्या परिसरात गेलो. दिवसभर
पाहिलेल्या ठिकाणांची मनातल्या मनात उजळणी करत समोर अस्ताला चाललेल्या दिनकराचा
निरोपाचा सोहळा अनुभवत होतो. बसल्या जागेवरून धोम धरणाचा फुगवटा, पलीकडे
पाचगणी-महाबळेश्वर-कोळेश्वर ही पठारं तर केंजळगड, पांडवगड हे किल्ले खुणावत होते.
वाऱ्याची झुळूक आणि पाण्यावरील लाटांची गुज या ठिकाणावरून उठूच नये असं वाटत होत.
दिवस संपला असला तरी आमची offbeat भटकंती काही संपली नव्हती आदित्य कडून आम्हाला कळलं की सध्या वाई मध्ये कृष्णाबाई उत्सव चालू आहे. १६५९ मध्ये वाईचा सुभेदार असलेल्या अफजलखानाच्या रूपाने स्वराज्यावर आलेले संकट टाळण्यासाठी शेंडेशास्त्री यांनी कृष्णेलाच साकडं घातलं होतं आणि तेव्हापासून या कृष्णाबाई उत्सवाची परंपरा वाईतील घाटांवर सुरू झालेली आहे. सरदार रास्ते यांनी पुढे ही परंपरा चालू राहण्यासाठी काही देणग्या दिल्याच्या नोंदी देखील आहेत आणि हीच परंपरा वाईकरांनी आजतागायत चालू ठेवली आहे. सांस्कृतीक वाईमधील अशा दिव्यांच्या रोषणाईने नटलेले घाट पाहण्यात वेगळीच मजा आहे.

दिवसाची समाप्ती झाली ती वाईमधील प्रशांत डोंगरे यांची
भेट घेऊन, यांच्या छोटेखानी नाश्ता सेंटर मध्ये लायब्ररी सुरू केली आहे. 4 कपाटे
पुस्तकांनी भरलेली असून नाश्ता करायला आलेली मंडळी ही पुस्तके वाचू शकतात. तसेच वाई
आणि आसपासच्या परिसरात निसर्गसंवर्धन, वणवे विझवणे, झाडे लावणे,रेस्क्यु ही कामे
चालूच असतात. वाई सुरूर रस्ता रुंदीकरणासाठी मोठमोठी वडाची झाडे तोडली जाणार होती,
ती सर्व झाडे वाचवण्यासाठी प्रशांत आणि टीम ने खूप चांगलं काम केलं आणि ही सर्व
झाडे वाचवली. आशा माणसांची भेट घेतल्याने आपली ही offbeat प्रवासवारी सोबतची भटकंती
सार्थकी ठरते.
पहिल्या दिवसाची भटकंती आणि खादाडी आटोपून हॉटेल वर आलो आणि हॉटेल
मालकाला सकाळी लवकर गरम पाणी चालू करा सांगितलं असता ते म्हणाले करतो ६ वाजता चालू.
अहं ६ वाजता निघायचं आहे दादा आम्हाला ४:३०-४:४५ लाच करा हे सांगताच ते जरा
चक्रावून गेले, पूर्ण दिवसभर फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी इतक्या लवकर कोणी उठेल याचा
त्यांना प्रश्न पडणं स्वाभाविकच होतं. पण माझ्यासोबतच्या पूर्ण ग्रुपला भटकंती
करताना कशावर फोकस द्यावा हे कळलं असल्याने सकाळी लवकर निघण्याला कुणाची ना नव्हती.
दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडताना चहाचे झुरके घेतले आणि प्रवास सुरु झाला साताऱ्याच्या
दिशेने.
साक्षी महामुलकर यांचं आम्हाला आज मार्गदर्शन मिळणार होतं. प्राचीन सातारा
हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक सातारा भटकंतीसाठी नक्कीच उपयुक्त आहे.
आर्किओलॉजी, इंडिओलॉजी, एप्लाइड आर्ट्स यात शिक्षण घेतलेल्या साक्षीचं वय जरी लहान
असलं तरी अभ्यास मात्र इतका दांडगा होता की त्याची प्रचिती आम्हाला दिवसभरात आली.
कृष्णामाईच्या प्रवासातील कृष्णा वेण्णेचा संगम आणि तेथील भवताल पाहणं म्हणजे पर्वणीच. थोरल्या शाहूंचे पाय लागून पावन झालेली सातारा नगरी आणि जवळच असलेल्या कृष्णा वेण्णेचा संगम परिसर विविध मंदिरांनी, घाटांनी, आणि राजघराण्यातील लोकांच्या समाधी स्थळांनी अक्षरशः नटला आहे. कुठे पाहू आणि कुठे नको असं होत होतं. अल्याड संगम माहुलीतील काशी विश्वेश्वर मंदिर तर पल्याड क्षेत्र माहुलीचं रामेश्वर मंदिर.
लहान मोठ्या मंदिरांची तर मांदियाळीच भरली होती. साक्षी महामुलकर आम्हाला प्रत्येक जागी नेऊन त्या त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती आणि इतिहास कथन करत होती. याच कृष्णेच्या वाळवंटात आपले छत्रपती संभाजी पुत्र थोरले शाहू महाराज यांची समाधी बघता आली.
मराठा साम्राज्याची विस्कळीत झालेली घडी ज्या महान योध्याने सावरली त्याच्या समाधीपाशी नतमस्तक होऊन पुढे मार्गस्थ झालो. स्वराज्याच्या कुलमुखत्यार सखी राज्ञी महाराणी येसूबाई यांची समाधी, थोरल्या शाहूंच्या पत्नी सगुणाबाई यांची समाधी आणि थोरल्या शाहूंचा लाडका खंड्या श्वान यांचीही समाधीस्थाने बघून पुढे मार्गस्थ झालो.

क्षेत्र माहुली मधील रामेश्वर मंदिर आणि घाटावरील पायऱ्या म्हणजे जणू स्वर्गात
जाणारी वाटच, हे जितक सुंदर त्याहून सुंदर वाटलं ते राधा शंकर मंदिर आणि तेथील
शांत-सुरम्य परिसर.
घाटाची प्रशस्त बांधणी, नदीचं खळखळणारं पात्र आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं. पाय निघूच नये अशा या जागा, इथलं सौंदर्य जितकं सुंदर तितकाच भारदस्त इथला इतिहास! पुढे लिंब येथील बारा मोटेची विहिरीकडे जाण्यासाठी महामार्गावरून उजवीकडे वळणार इतक्यात साक्षी कडून कळलं की इथे पूढे डावीकडे शाकंभरी देवीचं मंदिर आहे,मंदिर तितकं खास नाही पण मूर्ती सुंदर आहे मग काय, आपल्या offbeat प्रवासवारी नावाप्रमाणे गाडी तिकडेच वळवली, बसचे ड्रायव्हर दादा आणि बसमधील लोकं देखील चकित होते हे पाहून. मूर्ती खरंच सुंदर आणि रेखीव होती, विशेष म्हणजे भारतात असलेल्या सहा शाकंभरी पैकी ही एकच मूर्ती शरभावर आरूढ आहे.
पुढचा मोर्चा बारा मोटेच्या विहिरीकडे वळवला. एखाद्या विहिरीचे असे स्थापत्य म्हणजे त्या स्थपतींच्या संकल्पनेला आणि बांधून घेणाऱ्यास देखील अभिवादन.
ही विहीर बांधली होती थोरल्या शाहूंच्या पत्नी श्रीमंत विरुबाई यांनी. लिंब गावातील ही बारा मोटेची विहीर जेवढी प्रसिद्ध तितकाच येथील हत्ती घाट देखणा आहे परंतु जास्त कुणाला तो माहीतच नाही. offbeat प्रवासवारीची हीच खरी ओळख आहे की अशा अनवट ठिकाणी पाय वळवणे. मेणवलीचा घाट जसा सुंदर तितकाच सुंदर हा हत्ती घाट, तेथील मंदिरे आणि त्या मंदिरातील जुनी भित्तिचित्रे. मराठा स्थापत्य शैलीचे बरेच बारकावे या पेंटिंगमध्ये दिसून येतात. इतकं असतानाही हे स्थान बऱ्यापैकी दुर्लक्षित असंच आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिरातील मिशिवाला विठ्ठल देखील वेगळं काहीतरी पाहिल्याचं समाधान देतो. विठ्ठलाचा नामघोष करत इतर मंदिर पाहत आमची स्वारी निघाली आमच्या या सहलीच्या शेवटच्या ठिकाणी ते होतं कोटेश्वर मंदिर. साक्षी कडून त्या मंदिराची आख्यायिका ऐकली- महाबळेश्वर क्षेत्री उगम पावणाऱ्या कृष्णेच्या दोन्ही तीरांवर असणारी संख्या लिंब गावापर्यंत एक कोटीच्या घरात पोचते आणि तिथेच हे शंकराचं स्थान कोटेश्वर महादेव म्हणून पावन झालं.

दोन दिवसांचा असा "प्रवास कृष्णामाईचा" हा आगळा वेगळा हेरिटेज दौरा पदरात खूप
काही दान देऊन गेला, आदित्य चौंडे आणि साक्षी महामुलकर या दोन अभ्यासकांमुळे
प्रत्येक स्थानाचे बारकावे समजू-उमजू शकलो. अभ्यासक आहेत म्हणून त्यांची भाषा जड
असेल असं कुठेही जाणवलं नाही, आपल्याला समजेल उमजेल अशाच भाषेत त्यांनी ही ठिकाणे
आम्हाला दाखवली कुठेही आवाज मोठा करावा लागला नाही किंवा त्यांनी काही हातचं राखून
देखील ठेवलं नाही. समृद्ध आणि डोळस भटकंती म्हणजे काय याच परिपाक म्हणजे ही "प्रवास
कृष्णामाईचा" ही हेरिटेज सहल. जे अनुभवलंय त्यामानाने लिहायला अजून बरंच काही पण
थांबतो इथवरच...
फोटो साभार - शिवम मगदूम, उत्प्रेक्षा पाटील
माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्याने मोबाईल फॉरमॅट मारावा लागला, त्यामुळे माझ्याकडचे काहीही फोटो टाकू शकलो नाही, एखाद्या सहलीवरून आल्यावर फोटो न मिळणं याच दुःख काय असतं, याची आता चांगलीच कल्पना आली.
आपल्यासोबत फिरणारी माणस जर भारी असली, तर आपली भटकंती समृद्ध होते. offbeat प्रवासवारी याच साठी एखाद्या इतिहास अभ्यासक, संशोधक, जाणकार व्यक्तीला आपल्यासोबत ठेवून आपली भटकंती समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. तर चला मग भेटुयात offbeat प्रवासवारीच्या "समृद्ध सिन्नर" या पुढच्या
हेरिटेज सहलीला 28, 29 मार्च रोजी...

प्रिय विशाल, खूप छान ऑफ बीट भटकंतीचे वर्णन. आणि ती तज्ञ अभ्यासकांबरोबर केलेली असल्यामुळे आणखीन तुमची सहल समृद्ध झाली असेल.
ReplyDeleteआम्हालाही आता उत्सुकता लागली आहे या परिसरातून आमच्या सायकलवारीसाठी.
Menavli is my village and its nice to read about it all over again. Thank you vishal
ReplyDeleteधन्यवाद
Deleteलिखाण खूपच सुंदर अगदी फिरून आल्यासारखे वाटले , खूपच सुंदर प्रवास वारी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपचं सुंदर लिहिले आहे! Offbeat प्रवासवारीच्या या वारसा सहलीने गाठीशी दिलेले अविस्मरणीय क्षण विसरणे नाही..आता तर ते या ब्लॉगच्या माध्यमातून वाचून फार छान वाटले ! मनःपूर्वक धन्यवाद..अन् पुढच्या भटकंतीसाठी खूप शुभेच्छा ! 🙏🏻🌻♥️
ReplyDeleteधन्यवाद... तुमच्या सारखे अभ्यासक प्रत्येक वास्तू आणि तेथील इतिहास ज्या आत्मियतेने सांगता, त्यामुळेच या आमच्या भटकंती समृद्ध होतात🙏🙏
Delete